आबलोली, (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली या ग्रामपंचायतची विशेष ग्रामसभा सरपंच सौं.वैष्णवी वैभव नेटके यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच उत्साहात संपन्न झाली.यावेळी जि. प.चे शिक्षणाधिकारी किरण लोहार, जि. प.चे शिक्षण विस्तार अधिकारी नरेंद्र गावंड, आबलोली बिटचे शिक्षण विस्तार अधिकारी अविनाश शेंबेकर, तंटामुक्ती अध्यक्ष आप्पा कदम, उपसरपंच अक्षय पागडे, नोडल अधिकारी राजदत्त कदम, बचत गटाच्या सीआरपी सौं.मीनल कदम, सौं. वेदिका पालशेतकर, सौं. उज्वला पवार, मधुकर पागडे,कृष्णा पागडे, ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत सदस्य सौं. वृषालीताई वैद्य, सौ. शैला पालशेतकर, सौं. पायल गोणबरे,सौं. रुपाली कदम,श्रीमती. नम्रता निमुणकर, नित्यानंद कुळये, गोपीनाथ शिर्के यांचे सह सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक आणि ग्रामपंचायत सदस्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी मुख्यमंत्री पंचायतराज अभियानाचे संभाजीनगर येथून होणारे थेट लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी मौलिक मार्गदर्शन करून महत्त्वाच्या सूचना दिल्या.
संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988
Leave feedback about this