आबलोली (संदेश कदम )
गुहागर तालुक्यातील आबलोली येथील गुहागर तालुका कुणबी नागरी पतसंस्था मर्यादित आबलोली या पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयातील सभागृहात जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र, विभाग रत्नागिरी, गुहागर केंद्राच्या वतीने सचिव सन्मा. केदार चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक उत्साहात संपन्न झाली.
यावेळी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था या संस्थेचे विविध उपक्रम व त्या उपक्रमांची माहिती आणि येणाऱ्या काळात उपक्रमांचे नियोजन या संदर्भात तसेच जिल्हा परिषद गटातील पूर्ण प्राथमिक शाळा, हायस्कूल यामधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व मोफत वह्या वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत.या कार्यक्रमाचे पूर्वनियोजन करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती.
यावेळी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र या संस्थेचे संस्थापक सन्मा. निलेश भगवान सांबरे यांनी घेतलेला “कोकणचा सर्वांगीण विकास हाच जिजाऊंचा ध्यास” तसेच “माझ्या समाजाचा मी ऋणी लागतो गरिबांच्या सेवे इतके पुण्य जगात कोणतेही नाही” हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून समाजासाठी मोफत योगदान देणारे निलेश भगवान सांबरे यांच्या अधिपत्याखाली संपूर्ण महाराष्ट्र भर आरोग्य,शैक्षणिक, रोजगार असे महिलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी व पुरुषांसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. हे उपक्रम राबवताना कुठलाही जात धर्म पाळला जात नाही. कुठलाही पक्षभेद केला जात नाही. महिला पुरुष समानता राखून गुहागर तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटातील प्रत्येक वाडीत जाऊन शैक्षणिक साहित्य वाटप हा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. या सामाजिक उपक्रमात अनेकांनी सहभागी होऊन योगदान द्यावे असे आवाहन जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे सचिव केदार चव्हाण यांनी केले व विधायक उपक्रमांची मौलिक माहिती दिली.
यावेळी जिल्हा परिषद गट वाईज नियोजन करण्यात आले. व दिवाळी सुट्टी नंतर शाळा सुरू झाल्यावर शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचे निश्चित करण्यात आले. यावेळी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था सचिव केदार चव्हाण, गुहागरचे सदस्य अनंत डिंगणकर, ओमकार तिवरेकर, तुकाराम निवाते, यशवंत पागडे, प्रमेय आर्यमाने, संदेश कदम, अनिकेत पागडे – आबलोली, विशाल गोताड, संदीप भरणकर – आवरे, रमेश देसाई – कुडली, शंकर जोशी – शिवणे आदी.सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988
Leave feedback about this