1. संजय गांधी निराधार योजना समिती सदस्यपदी करंबवणे गावचे माजी सरपंच संजय जाधव यांची निवड
  2. धनंजयभाई देसाई यांच्या पुण्यातील घरावर दरोडा टाकून,अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमांवर कारवाई करावी – हिंदूराष्ट्र सेना कार्यकर्त्यांची जिल्हा अधिकारी यांच्याकडे आग्रही मागणी
  3. भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मुंबई वृत्तपत्र विक्रेता दीन साजरा करण्यात आला
  4. बॉर्डरलेस बाबासाहेब एक विचार चे प्रणेते डॉक्टर राजेंद्र जाधव यांना सर्वपक्षीय मेळाव्यामध्ये अस्वस्थ वाटल्यामुळे सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये केलं भरती. भदंत डॉक्टर राहुल बोधी महाथेरो यांनी घेतली हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट
  5. आपुलकी मतिमंद शाळा कर्म शाळेमध्ये वैद्यकीय तपासणी व पालक मेळावा संपन्न
Blog आणखी ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

तानाजी कांबळे यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर.!

“एका सच्चा भिमसैनिकाच्या प्रामाणिक कार्याची सरकारने घेतली दखल”

मुंबई (अंकुश हिवाळे) : मागील २५ वर्षाहून अधिक काळ पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे यांना महाराष्ट्र सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार पुरस्कार जाहीर केला आहे.तानाजी कांबळे हे अन्याय,अत्याचाराच्या विरोधात संघर्ष करणारे लढवय्ये कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जाती, आणि इतर मागास प्रवर्गाच्या कल्याणासाठी,विकासासाठी उल्लेखनिय काम करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने प्रतिवषीऀ अत्यंत महत्त्वाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार दिला जातो.महाराष्ट्र शासन  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्रमांक : पुरस्कार -2025 /प्र.क्र.36 दिनांक 6 जुन 2025 अन्वये राज्याचे सामाजिक न्याय मंत्री, नामदार संजयजी शिरसाट यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे.

ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे हे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आहेत. महापुरुषांच्या विचारांवर त्यांची प्रचंड श्रद्धा आहे. गेली 25 वर्ष ते पत्रकारितेमध्ये कार्यरत असून अनेक वर्तमानपत्रांमध्ये त्यांनी पत्रकारिता केलेली आहे.आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून आणि सामाजिक कार्यातून तानाजी कांबळे यांनी सर्वसामान्य माणसांना न्याय देण्यासाठी जिवाची पर्वा न करता संघर्ष केलेला आहे.अन्यायाच्या विरोधात सरकार पातळीवर वाचा फोडण्याचे काम ते अविरत करीत आहेत .शेतकरी, कामगार , मजूर, महिला, अपंग व इतर घटकांसाठी त्यांचे मोठे योगदान आहे..

सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार तानाजी कांबळे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील अरुणा प्रकल्पातील बाधित प्रकल्पग्रस्त आहेत. लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा या संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी आवाज उठवला होता. तंटामुक्त समितीचे ते अध्यक्षही होते त्यांच्या कारकिर्दीत गावात एकही तंटा बखेडाची नोंद नाही. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभेचे सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे ते पदाधिकारी आहेत.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे जिल्हा, भवतु सब्ब मंगलम आदी नामवंत संस्थांनी सामाजिक कार्याची दखल घेऊन तानाजी कांबळे यांना सन्मानित केलेले आहे.मुंबईतील झोपडपट्टी धारकांचे प्रश्न, महापालिका कामगारांच्या प्रश्नावर ते सतत काम करीत असतात.

दारूबंदी, अंधश्रद्धा, अपंग,मनोदुबऀल, मतिमंद, वृद्धांसाठी, तसेच वंचित उपेक्षित घटकासाठी, केलेल्या योगदानाची दखल घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यावर्षीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार तानाजी कांबळे यांना जाहीर केला आहे.

हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा येत्या १० जून 2025 रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,नरिमन पॉइंट, मंत्रालया समोर,मुंबई, येथे सकाळी १०.०० वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री संजयजी  शिरसाट, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ,खा.अरविंद सावंत यांच्या  प्रमुख उपस्थितीत समारंभ पूर्वक प्रधान करण्यात येणार आहे.

ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहिर झाल्यानंतर युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख भाई तानसेन ननावरे,जयवंत तांबे, निलेश गद्रे,ॲड.संदीप जाधव,भीम शाहीर जनिकुमार कांबळे, विश्वनाथ कदम, सिध्दार्थ म्हस्के,बाळकृष्ण कोकीसरेकर, समाजभूषण पत्रकार राजू झनके, पत्रकार महादू पवार,समाजभूषण प्रकाश जाधव,समाजभूषण उत्तम दादा गायकवाड, समाजभूषण सो.ना.कांबळे,भिकाजी वदेऀकर,रवी गरुड, भीमराव संवाद कर,बाळकृष्ण चिंचवलकर,रतन , अंकुशराव हिवाळे,अस्वारे,पत्रकार संजय बोपेगावकर, पत्रकार निलेश मोरे, पत्रकार संजय गिरी, पत्रकार हरिचंद्र पाठक, पत्रकार मनोज कदम,कुवैत येथुन संजय आनंद आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सामाजिक कार्यकर्ते,ज्येष्ठ पत्रकार तानाजी कांबळे यांचे अभिनंदन केले आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ पत्रकार तानाजी कांबळे यांच्या भावना
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मी कृतज्ञतेने भारावून गेलो आहे.

या पुरस्काराने माझ्या मातीमोल जीवनाचे सोने झाले आहे.वादळ, वाऱ्यात,मी पाय रोवून मी ना भाला,ना फरशी, ना गाव पाहिजे,पण…
तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे.! या जिद्दीने आणि स्फूर्तीने मी निप:क्ष,निर्भीड, निस्वार्थ भावनेने काम करीत राहिलो.माझ्या कठोर परिश्रमाची,योगदानाची, समर्पणाची राज्य सरकारने दखल घेतल्याबद्दल, मी मायबाप सरकारचे मनःपूर्वक आभार मानतो, पुरस्काराचा हा सोनेरी क्षण मी कृतज्ञतेच्या भावनेने आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जपून ठेवेन.अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या आणि आजवरच्या या प्रवासात मला आपलं माणुन मदत करणाऱ्या भाई तानसेन ननावरे यांच्यासह प्रत्येकांचे कृतज्ञतापूर्वक आभार.! हा पुरस्कार केवळ माझ्या कामगिरीची पावती नाही तर माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या मार्गदर्शकांचे आणि सहकाऱ्यांचे प्रतिबिंब देखील माझ्या पुरस्काराच्या प्रवासाचा भाग असल्याचा सूतोवाच त्यानी याप्रसंगी केला.

संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988

Leave feedback about this

  • Quality
  • Price
  • Service

PROS

+
Add Field

CONS

+
Add Field
Choose Image
Choose Video