Blog आणखी ई पेपर क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

नागपूर दंगलीबाबत संघाची पहिली प्रतिक्रिया, “औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नसून…”

नागपूर : औरंगजेबाची कबर हटवण्यावरून नागपुरातील महाल परिसरात सोमवारी रात्री दोन गटांच्या तरुणांमध्ये जोरदार राडा झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जमाव रस्त्यावर उतरला होता. त्यानंतर समाजकंटकांनी विविध भागात जाळपोळ करत पोलिसांवर दगडफेक केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. या दगडफेकीत पोलिस जखमी झाले आहेत. त्यानंतर आता नागपुरातील काही भागात पुढील आदेश येईपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर दोन दिवसांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नव्हती.

परंतु, बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा बंगळूरूमध्ये होणार असून या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी प्रसार माध्यमांशी विचारलेल्या प्रश्नानंतर यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. औरंगजेबाचा मुद्दा हा सध्या संयुक्तिक नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठल्याही प्रकारच्या हिंसाचाराचे समर्थन करत नाही, अशा स्पष्ट शब्दात सुनील आंबेकर यांनी सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या औरंगजेबाचा मुद्दा आणि नागपूरमध्ये घडलेल्या हिंचारावर संघाची भूमिका स्पष्ट केली.

नागपूरात झालेल्या हिंसाचारानंतर आता स्थानिक नागरिकांनी नेमका काय प्रकार घडला ते सांगितले आहे. चार पिढ्यांपासून एकाच ठिकाणी गुण्यागोविंदाने राहणाऱ्या महाल परिसरात सोमवारी झालेल्या दंगलीनंतर दोन समाजातील मने दुभंगली आहेत. दंगलखोरांनी जुने हिस्लॉप कॉलेज परिसरात नागरिकांची घरे, गाड्यांवर दगडफेक केली. यात अनेक गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले. पेशने यांच्या घरातील चारचाकी जळून खाक केली. दंगलखोरांनी घराच्या दारावरील, वाहनांवरील छायाचित्र पाहून तोडफोड केली, अशी माहिती परिसरातील नागरिकांनी दिली.

सुनील आंबेकर नेमके काय म्हणाले?

सध्या नागपूरमध्ये झालेल्या दंगलीवर संघाची भूमिका काय आहे? असा प्रश्न पत्रपरिषदेदरम्यान अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांना विचारण्यात आला. यावर आंबेडकर यांनी संघ कुठल्याही प्रकारच्या हिंसेचे समर्थन करत नाही अशी भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर त्यांना देशात अनेक महत्त्वाचे प्रश्न असताना आता औरंगजेबाचा प्रश्न समोर करून आंदोलन करणे योग्य आहे का? असाही प्रश्न विचारण्यात आला. यावर आंबेडकर यांनी औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही, अशा शब्दात आपली भूमिका स्पष्ट केली.

संघाच्या प्रतिक्रियेवर आमदार दटके म्हणाले

संघाच्या या प्रतिक्रियेनंतर मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली असता त्यांनी सुनील आंबेडकर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया द्यावी इतके आपण मोठे नाही असे सांगितले. तसेच हा संपूर्ण प्रकार सुनीयोजित कटाचा भाग आहे या भूमिकेवर ते आताही ठाम आहेत.

संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988

Leave feedback about this

  • Quality
  • Price
  • Service

PROS

+
Add Field

CONS

+
Add Field
Choose Image
Choose Video