आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील अतिशय ग्रामीण आणि डोंगराळ भागातील भातगाव सुवरे वाडी येथील गरीब कुटुंबातील कु. प्रणाली पुनाजी सुवरे हिची रत्नागिरी जिल्हा पोलीस भरती सन २०२२ – २३ च्या पोलीस भरतीमध्ये पोलीस शिपाई पदी नियुक्ती झाली असून गुहागर तालुक्यातील आबलोली येथील सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली येथे सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीच्या संचालिका सौ. सावी संदेश साळवी यांनी शाल, पुष्पगुच्छ आणि भेट वस्तू देऊन कु. प्रणाली पुनाजी सुवरे हिचा सत्कार करुन तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीचे संचालक संदेश साळवी,पत्रकार संदेश कदम, मिरजोळे – रत्नागिरी येथील हवालदार दत्तात्रय किर,चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालय आबलोलीचे शिक्षक सिताराम व्हनमाने, संदिप महाडिक, शुभम सावंत आदी. उपस्थित होते
सत्काराला उत्तर देताना कु. प्रणाली पुनाजी सुवरे हिने असे सांगितले की. मी कब्बडी पट्टू खेळाडू आहे माझे शिक्षण १० वी पर्यंत मांजरे हायस्कूल येथे झाले. आणि ११ वी, १२ वी जाकादेवी कॉलेज येथे झाले असून मी आता बी. ए. च्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. माझी परिस्थिती गरिबीची असली तरी काही तरी करण्याची जिद्द आणि आई वडिलांचे व समाजाचे नाव उच्च स्थानी नेणार आहे .यामध्ये मला मिरजोळी – रत्नागिरी येथील हवालदार दत्तात्रय कीर यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले आहे असे कु. प्रणाली पुनाजी सुवरे हिने आवर्जून सांगितले
संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988
Leave feedback about this