1. संजय गांधी निराधार योजना समिती सदस्यपदी करंबवणे गावचे माजी सरपंच संजय जाधव यांची निवड
  2. धनंजयभाई देसाई यांच्या पुण्यातील घरावर दरोडा टाकून,अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमांवर कारवाई करावी – हिंदूराष्ट्र सेना कार्यकर्त्यांची जिल्हा अधिकारी यांच्याकडे आग्रही मागणी
  3. भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मुंबई वृत्तपत्र विक्रेता दीन साजरा करण्यात आला
  4. बॉर्डरलेस बाबासाहेब एक विचार चे प्रणेते डॉक्टर राजेंद्र जाधव यांना सर्वपक्षीय मेळाव्यामध्ये अस्वस्थ वाटल्यामुळे सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये केलं भरती. भदंत डॉक्टर राहुल बोधी महाथेरो यांनी घेतली हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट
  5. आपुलकी मतिमंद शाळा कर्म शाळेमध्ये वैद्यकीय तपासणी व पालक मेळावा संपन्न
Blog ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समिती कडून मुंबई गोवा महामार्गाच्या महाराजा गणेशोत्सव उत्सव आंदोलनाला यश

आबलोली (संदेश कदम)
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान. अजित दादा पवार यांनी त्वरित आंदोलनाची दखल घेत त्यांच्या मंत्रालयातील दालनात रायगडचे खासदार श्री. सुनीलजी तटकरे यांच्या मध्यस्थीने बळीराज सेना आणि मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समिती यांची मुंबई गोवा महामार्गावरील कोकणात जाणाऱ्या लोकांना येणाऱ्या अडचणींवर आणि महामार्ग जो खड्डेमय झाला आहे त्यामुळे होणाऱ्या अपघातांवर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, कोकण आयुक्त डॉ.सूर्यवंशी, सर्व जिल्हाधिकाऱ्यां सहित संबंधित वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत जम्बो बैठक घेण्यात आली. या बैठकीत जनतेच्या ज्या मुंबई गोवा महामार्ग संबंधित मागण्या होत्या त्या बहुतांश मागण्या सन्मा. उपमुख्यमंत्री अजित दादांनी मान्य करून संबंधितांना अधिकाऱ्यांना २२ कोटी रुपये फंडाची तरतूद करत त्वरित उद्यापासूनच त्यावर काम करण्याचे करण्यासाठी आदेश दिले.
आम्ही खालील मागण्या सरकार समोर ठेवल्या होत्या येणाऱ्या गणेशोत्सवापूर्वी

https://www.youtube.com/sanvidhanvarta

१)महामार्गावरील दोन्ही बाजूचे खड्डे पेवरब्लॉकने बंद करण्यात यावेत.
२)महामार्ग पाऊस गेल्यानंतर तीन महिन्यात पूर्ण करण्यात यावा
३)संबंधित भ्रष्ट अधिकारी व ठेकेदारांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात यावे
४)२०१० सालापासून आतापर्यंत जे मृत्युमुखी पडले त्यांच्या नातेवाईकांना भरघोस आर्थिक मदत करावी
५) महामार्गावर प्रवास करताना अपघातात अपंगत्व आले आहे किंवा अपघाती घरात जो तरुण असेल त्याला सरकारी नोकरी द्यावी
६) महामार्गावर प्रत्येक २५ किलोमीटर अंतरावर सुलभ सौचालय,ट्रॉमा केअर सेंटर उभारावी
७) प्रत्येक २५ किलोमीटर अंतरावर डॉक्टर,स्टाफ व सर्व सोयी सहित ॲम्बुलन्स उभी पाहिजे
८) थोड्या थोड्या अंतरावर दोन्ही दलाचे पोलीस २४ तास सेवेकरिता उपलब्ध असावेत. जेणेकरून मध्येच कोणी गाड्या घालणार नाहीत आणि त्यामुळे ट्रॅफिक होणार नाही
९) जेथे गतिरोधक बनवलेले आहेत त्यावर झेब्रा पट्टी मारण्यात यावी
१०) महामार्गावरील ड्रायव्हरजनच्या ठिकाणी ठळक अक्षरात सूचनाफलक लावण्यात यावेत
११) सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती स्थापन करून त्यात आमचे ४ सदस्य असावेत
वरीलपैकी ९९% मागण्या सदर बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी मांडणी केल्या म्हणून आम्ही मुंबई गोवा महामार्गाचा महाराजा गणपती उत्सवरुपी जे आंदोलन घेणार होतो ते तात्पुरते तरी स्थगित करत आहोत. अशी माहिती बळीराज सेनेचे प्रमुख अशोकदादा वालम यांनी आमच्या प्रतिनिधिशी बोलताना दिली.

संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988

Leave feedback about this

  • Quality
  • Price
  • Service

PROS

+
Add Field

CONS

+
Add Field
Choose Image
Choose Video