Blog ई पेपर क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

वाल्मीक कराडवर मकोका, सुरेश धसांनी दिली ही प्रतिक्रिया

बीड : बीडमधील खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यातच कराडवर मकोका कलमाअंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता गेले काही महिने हे प्रकरण लावून धरलेल्या भाजप आमदार सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “राज्य सरकारने जी एसआयटी नेमली आहे. त्या एसआयटीने आपले काम केले आहे. आता कायद्याच्या कचाट्यात जे जे सापडतील, त्यामध्ये मग कोणीही असो. राज्य सरकार त्यांना कोणालाही सोडणार नाही.” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे. 

“पोलीस यंत्रणा असून आम्ही कोणीही काहीही म्हटल तरी काही होत नसते. एसआयटी नेमाल्यानंतर प्रभावीपणे काम करत आहे. त्यांनी जी कडी जोडली आहे, यामध्ये जे जे लोकं सापडतील, त्या त्या लोकांवर कारवाई होणार आहे. न्यायालयात काय घडलं? ही माहिती अद्याप माझ्यापर्यंत आलेली नाही. पण कायद्याच्या पुढे कोणीही मोठा नसतो,” अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी माध्यमांसमोर दिली. दरम्यान, मस्‍साजोग खंडणी प्रकरणातील संशयित आरोपी वाल्‍मिक कराडवर न्यायालयाने मकोका लावल्यानंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, मंगळवारी (14 जानेवारी) वाल्‍मिक कराडच्या आईने सकाळपासून परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या धरला होता. या आंदोलनानंतर परळीमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच, यावेळी कराड समर्थकांनी पोलीस ठाण्यासमोर जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, यावेळी आमदार सुरेश धस आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच, काही महिलांनी त्यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन केले.

आमदार सुरेश धस म्हणाले की, या प्रकरणातील गुन्ह्यात वाल्मिक कराड हा आरोपी आहे की आणखी कोण? हा मुद्दा नव्हता. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मुद्दा होता. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. कोणताही दोषी सुटणार नाही, अशी मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतली होती. आज केज न्यायालयात काय घडले, याची माहिती नाही. परंतु देशमुख प्रकरणात कोणताही दोषी सुटणार नाही,” असे त्यांनी सांगितले. दरम्यान, वाल्मिक कराडला मकोका लागताच सुरेश धस हे लगबगीने मंत्रालयाच्या दिशेने रवाना झाले.

संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988

Leave feedback about this

  • Quality
  • Price
  • Service

PROS

+
Add Field

CONS

+
Add Field
Choose Image
Choose Video