1. संजय गांधी निराधार योजना समिती सदस्यपदी करंबवणे गावचे माजी सरपंच संजय जाधव यांची निवड
  2. धनंजयभाई देसाई यांच्या पुण्यातील घरावर दरोडा टाकून,अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमांवर कारवाई करावी – हिंदूराष्ट्र सेना कार्यकर्त्यांची जिल्हा अधिकारी यांच्याकडे आग्रही मागणी
  3. भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मुंबई वृत्तपत्र विक्रेता दीन साजरा करण्यात आला
  4. बॉर्डरलेस बाबासाहेब एक विचार चे प्रणेते डॉक्टर राजेंद्र जाधव यांना सर्वपक्षीय मेळाव्यामध्ये अस्वस्थ वाटल्यामुळे सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये केलं भरती. भदंत डॉक्टर राहुल बोधी महाथेरो यांनी घेतली हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट
  5. आपुलकी मतिमंद शाळा कर्म शाळेमध्ये वैद्यकीय तपासणी व पालक मेळावा संपन्न
Blog ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

शिळफाटा मार्गावर कोंडित अडकायची आम्हाला सवय, आता तर पाच दिवस सुट्टी घेऊ… प्रवाशांच्या उद्विग्न प्रतिक्रिया

डोंंबिवली : कल्याण-शिळफाटा रस्त्यावरून दररोज जात असताना वाहतूक कोंडीमुळे आम्ही हैराण असतो. आमच्या नशिबीच ही कोंडी का आली, असे प्रश्न आम्ही दररोज कार्यालयात जात असताना करत असतो. आता तर निळजे रेल्वे उड्डाण पुलाच्या पुनर्बांधणीचे काम ५ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत करण्यात येणार आहे. या कालावधीत शिळफाटा रस्त्यावरील पलावा जंक्शनकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. अगोदरच कोंडीने बेजार शिळफाटा रस्ता पाच दिवस बंंद राहिला तर प्रवासी या कोंडीत तासन तास अडकून पडतील. त्यापेक्षा सुट्टी टाकून घरी बसू, कोण तडफडेल या वाहतूक कोंडीत, असे उद्विग्न प्रश्न या रस्त्यावरून नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून करण्यात येत आहेत.

शिळफाटा रस्त्यावर टाटा नाका, गोळवली, प्रीमिअर मैदान समोर मेट्रो मार्गाची कामे सुरू आहेत. काटई ते खिडकाळी भागातील रस्ते बाधित शेतकऱ्यांना शासनाने भरपाई दिली नसल्याने या टप्प्याचे काम रखडले आहे. भरपाईशिवाय एक इंच जमीन घ्यायची नाही, अशी भूमिका बाधित शेतकऱ्यांनी घेतली आहे.

काटई भागातील अरूंद रस्ता, मेट्रोची कामे यामुळे शिळफाटा रस्ता वाहतूक कोंडीत अडकत आहे. एका लोकप्रतिनिधीच्या घाईमुळे शिळफाटा रस्त्यावर मेट्रोची कामे लोकसभा निवडणुकीपूर्वी हाती घेण्यात आली.

समर्पित जलदगती रेल्वे मार्गासाठी शिळफाटा रस्त्यावरील निळजे रेल्वे उड्डाण पूल पुलाच्या पुनर्बांधणीचे काम समर्पित जलदगती रेल्वे मालवाहू विभागातर्फे (डेडिकेटेट फ्रेट काॅरिडाॅर कार्पाेरेशन) करण्यात येणार आहे. या कामासाठी ५ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी शिळफाटा रस्त्यावरील हलकी, जड, अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. हे पर्यायी मार्ग डोंबिवलीमार्गे माणकोली उड्डाण पूल, काटई नाका ते बदलापूर पाईपलाईन तळोजा रस्ता निश्चित करण्यात आले आहेत. माणकोली पुलाचा मार्ग डोंबिवली शहरातून आहे. मोठागाव रेल्वे फाटकाजवळ सतत कोंडी असते. डोंबिवली शहर कोंडीत अडकण्याची चिन्हे आहेत. काटई नाका, गोविंदवाडी, दुर्गाडी, कोन गाव कोंडीत अडकण्याची शक्यता आहे.

शिळफाटा रस्त्यावरून दररोज आपण दुचाकीवरून नवी मुंबईत कामाच्या ठिकाणी जातो. या रस्त्यावर आठवड्यातून तीन ते चार वेळा वाहन कोंडीचा फटका बसतो. पाच दिवस पलावा जंक्शन भागात रेल्वेचे काम सुरू राहणार असल्याने या भागातील वाहतूक बंद असेल. शिळफाटा रस्ता कोंडीने जाम होईल. कोंडीत अडकण्यापेक्षा एकतर घरी राहू, नाहीतर रेल्वेचा मार्ग पत्करू. – कृष्णा गुरव, प्रवासी.

शिळफाटा रस्त्यावरून दररोज मी माझ्या खासगी वाहनाने मुंबईत अंधेरी भागात नोकरीला जाते. या रस्त्यावर दररोज कोंडीचा फटका बसतोच. पाच दिवसाच्या कामामुळे मी कोंडीत अडकण्यापेक्षा सुट्टी घेणार आहे. – प्रवासी, महिला अधिकारी, डोंबिवली

संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988

Leave feedback about this

  • Quality
  • Price
  • Service

PROS

+
Add Field

CONS

+
Add Field
Choose Image
Choose Video