“संविधान दिवस म्हणजे आपल्या राष्ट्राच्या स्वाभिमानाचा, एकतेचा आणि न्यायप्रियतेचा उत्सव! संविधांनाच्या अमृत महोत्सवानिमित्ताने आपण एकत्र येऊन आपल्या संविधानाच्या मुलभूत तत्त्वांना वंदन करणार आहोत, ज्यामुळे आपले स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता यांना मूर्त रूप मिळाले. चला, आपण एकत्र येऊन आपल्या संविधानाच्या अमूल्य तत्त्वांना सलाम करूया. हा दिवस फक्त उत्सव नाही, तर आपल्या हक्कांची जाणीव आणि कर्तव्यांची आठवण आहे.
भारतीय भिक्खू संघ,देव देश प्रतिष्ठान, छबी सहायोग फाउंडेशन आणि संविधान वार्ता च्या संयुक्त विद्यमाने आपण सर्वजण एकत्र येऊन संविधान दिनाचा उत्सव साजरा करत आहोत. या निमित्ताने, संविधानावर सखोल चर्चा केली जाणार आहे, तसेच समता न्याय स्वातंत्र्य बंधुत्व पर्यावरण या विषयावर तळागाळात जाऊन काम करणाऱ्या 10 मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम केवळ संविधानाचा गौरव साजरा करण्याचा नाही, तर समाजाला प्रेरणा देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा आदर करण्याचा सोहळा आहे. चला, या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होऊया आणि आपल्या राष्ट्रनिर्मितीच्या प्रवासाला अभिवादन करूया!”
या खास दिवशी, आपल्या संविधानाच्या महत्त्वाला उजाळा देण्यासाठी आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत त्याचे विचार पोहोचवण्यासाठी आपली उपस्थिती अत्यंत महत्त्वाची आहे.
स्थळ: २ रा माळा, शहीद स्मारक, रमाबाई आंबेडकर नगर, घाटकोपर पूर्व
दिनांक: २६ नोव्हेंबर २०२४
वेळ: सायं. ५.३० वाजता
संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988
Leave feedback about this