आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील अली पब्लिक स्कूलचा इयत्ता ८ वीचा विद्यार्थी साईम सरफराज माळगुंडकर याने क्रीडा क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. २१ सप्टेंबर रोजी पुणे बालेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या ३७ व्या MKBA महाराष्ट्र स्टेट किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२५ या राज्यस्तरीय स्पर्धेत साईमने चमकदार कामगिरी करत दोन रौप्य (सिल्वर) पदके पटकावली.
महाराष्ट्र किक बॉक्सिंग असोसिएशनच्या (MKBA) वतीने आयोजित या प्रतिष्ठित स्पर्धेमध्ये पुणे, अमरावती, मुंबई, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी आणि खेड अशा विविध ठिकाणचे स्पर्धक सहभागी झाले होते. या तीव्र स्पर्धेतही साईमने आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.साईमच्या या यशामध्ये त्याला लाभलेल्या योग्य मार्गदर्शकाचे मोठे योगदान आहे. त्याचे मार्गदर्शक हुजैफा ठाकूर यांच्या प्रशिक्षणाखाली त्याने कसून सराव केला, तर असोसिएशनच्या अध्यक्ष योगिता खाडे यांचेही यासाठी महत्त्वाचे सहकार्य लाभले.
साईम माळगुंडकरच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष श्री. विनोद गणेश जानवळकर यांनी सन्मान करुन भेट वस्तू देत कौतुक केले आहे. साईम याने केवळ शाळेचे नव्हे तर जिल्ह्याचे नाव राज्य पातळीवर उंचावले आहे. यावेळी जानवळे उपसरपंच सौ. वैभवी विनोद जानवळकर, मनसे विभाग अध्यक्ष विश्वजीत पोद्दार, शाखा अध्यक्ष सुशांत कोळंबेकर, मुख्याध्यापक कैलास शार्दुल , शाळा व्यवस्थापनचे संदिप कोडविलकर यांचे सह.विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होते.
संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988
Leave feedback about this