शिंदेंच्या मेळाव्याचा विक्रम तोडणार
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील खारवी समाज सभागृहात ज्या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची यांचा मेळावा झाला त्याच ठिकाणी गुहागरचे कार्यसम्राट आमदार भास्करशेठ जाधव 6 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11:00 वाजता जाहीर मेळावा घेऊन कार्यकर्त्यात जल्लोष निर्माण करणार आहेत,नवचैतन्य निर्माण करणार आहेत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना आमदार भास्करशेठ जाधव म्हणाले की, 6 तारखेला तुम्ही प्रत्यक्ष बघा माझ्याबरोबर कीती जनसमुदाय येतो ते माझ्या पक्षातील चार कार्यकर्ते गेले असले तरी चाळीस कार्यकर्ते निर्माण करण्याची धमक माझ्यात आहे आणि ते तुम्हाला उद्या जाहीर मेळाव्यातून दिसून येईल मी कृती करून दाखवतो असा मार्मिक टोलाही विरोधकांना आमदार भास्कर शेठजाधव यांनी हाणला त्यामुळे 6 ऑगस्टला हेदवतड येथे आमदार भास्करशेठ जाधव यांची तोफ धडाडणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळाव्याचा विक्रम आमदार भास्करशेठ जाधव तोडणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
https://www.youtube.com/sanvidhanvarta
संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988
Leave feedback about this