महाराष्ट्र राजकीय

‘मविआ’ने महिलांसाठी जाहीर केलेले ३००० रुपये देता येतील का?; अजित पवारांनी राज्याचं आर्थिक गणितच सांगितलं

अजित पवार म्हणाले, आपले बजेट साडे सहा लाख कोटींचं आहे. पुढच्यावेळी सात लाख कोटींचं होईल. पुढच्यावेळी बजेट जसं वाढेल, तसं २१ वर्षांच्या महिलाही या योजनेत वाढणार आहेत, त्यामानाने ६५ वर्षाच्या कमी महिला रिटायर्ड होतात. आता काहीजण बेरोजगार तरुणांना चार हजार रुपये देणार आहेत असं सांगत आहेत. आता त्यात पत काही लाख कोटींची भर पडेल म्हणजे बजेट ७ लाख कोटींचं असलं तर त्यामध्ये सगळ्यांचे पगार, पेन्शन, घेतलेल्या कर्जाचं व्याज यालाच जातात साडे तीन लाख कोटी रुपये. रोहिलेल्या साडे तीन लाख कोटी रुपयामध्ये डेव्हलपमेंट आहे. यामध्ये आता घोषणांचा पाऊस सुरू आहे, ब्रम्हदेव आला तरी या घोषणा पूर्ण होणार नाहीत. सगळ्यांना एसटी फुकट, कशाचा कशालाच मेळ नाही, अशी टीका अजित पवार यांनी केली.

“विरोधकांनी आता एवढे लोख कोटी रुपये कसे उपलब्ध करणार आहे हे सांगाव.आम्ही सुरु केलेली योजना आहे त्याला ४५ हजार कोटी रुपये लागत होते. १५ हजार कोटी वीजेसाठी लागत होते. आम्ही सगळा हिशोब केला तेव्हा ८० हजार कोटींच्या पुढे जात होता. आता यांनी या सगळ्याच्या दुप्प्ट केला आहे. याचा हिशोब दोन, तीन लाख कोटी रुपयांवर जाईल. हे विरोधक लोकांची फसवणूक करत आहेत. ज्या राज्यात यांनी योजना सुरू केल्या त्या त्यांना बंद कराव्या लागल्या आहेत, असा आरोपही अजित पवार यांनी महाविकास आघाडीवर केला.

Leave feedback about this

  • Quality
  • Price
  • Service

PROS

+
Add Field

CONS

+
Add Field
Choose Image
Choose Video