आबलोली (संदेश कदम)
कठीण परिस्थितीत कोण कुठे गेला हे न पाहता आहे त्या परिस्थितीत कार्यकर्ते जोडा संपर्क वाढवा मुळमुळीत पणा झटका,आक्रमक व्हा..! आणि पक्ष संघटना अधिक बळकट करा असे आवाहन आमदार भास्करशेठ जाधव यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले
गुहागरचे विद्यमान आमदार भास्करशेठ जाधव हे गुहागर दौ-यावर आले असता शासकीय विश्रामगृह येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत होते यावेळी तोच जोश तोच उत्साह आणि तोच जल्लोष आमदार भास्करशेठ जाधव यांच्या मध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये दिसत होता. कार्यकर्त्यांनी आमदार भास्करशेठ जाधव यांना भेटण्यासाठी तुफान गर्दी केली होती. यावेळी आमदार भास्करशेठ जाधव यांचा वाढदिवसही उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला

यावेळी आमदार भास्करशेठ जाधव यांनी कार्यकर्त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाची ताकद कशी वाढवायची मतदार कसे जोडायचे त्यांना कसे आपले करायचे,पक्ष सभासद कसे करायचे याबद्दल महत्वाच्या टिप्स देऊन मौलिक मार्गदर्शन करुन येणाऱ्या जि. प. व पं. स. निवडणुका जिंकायच्या असा निर्धारही आमदार भास्करशेठ जाधव यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार भास्करशेठ जाधव यांच्या समवेत विक्रांतदादा जाधव,विनायक मुळे,तालुका प्रमुख सचिन बाईत,सचिव विलास गुरव,रविंद्र आंबेकर, काशिनाथ मोहिते,माजी सभापती पूर्वीताई निमूणकर,श्रीमती.वनिता डिंगणकर,अपर्णा रणपिसे, पुजा कारेकर,प्रविण ओक, संतोष तांदळे, सौ. स्नेहाताई वरंडे, जेष्ठ पत्रकार निसारखान यांचेसह महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, पुरुष कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते
संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988
Leave feedback about this