June 29, 2026
Sanvidhan Varta News Network 1303, Mayuresh Cosmos, Sector 11, CBD Belapur, Navi Mumbai.
Blog आणखी ई पेपर नोकरी विषयक महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

विद्यार्थ्यांना गुणपत्रिका व पदवी प्रदान करा — रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेची मागणी

अमरावती :

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतर्गत विविध शाखांमध्ये शिक्षण घेत असलेल्या CGS (Credit Grade System) व CBCS (Choice Based Credit System) प्रणालीतील एकत्रित पदवीधारक विद्यार्थ्यांना तत्काळ गुणपत्रिका व पदवी प्रदान करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेने विद्यापीठाचे कुलसचिव अविनाश असनारे व परीक्षा नियंत्रक डॉ. नितीन कोठी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

https://www.youtube.com/sanvidhanvarta

सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, विद्यापीठांतर्गत CGS व CBCS या शैक्षणिक प्रणाली अंमलात असताना अनेक विद्यार्थ्यांनी विविध शाखांमध्ये प्रवेश घेतला. मात्र, कालांतराने या प्रणाली बंद करण्यात आल्या. परिणामी, या प्रणालींमध्ये शिक्षण पूर्ण केलेल्या आणि परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका व पदवी मिळण्यात अडथळे निर्माण झाले आहेत.

या गुंतागुंतीच्या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाऊ शकते. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना कोणत्याही अडथळ्यांशिवाय तातडीने सामावून घेऊन, त्यांना मान्यताप्राप्त पदवी प्रदान करण्यात यावी, तसेच विद्यमान प्रणालीतील अटी शिथिल कराव्यात, अशी स्पष्ट मागणी यावेळी करण्यात आली.

सदर निवेदन रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष व विदर्भ सरचिटणीस अ‍ॅड. आकाश हिवराळे यांनी दिले.

यावेळी सुरेंद्र अवचार, सारंग देव, आदेश वाघ यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या मागणीवर विद्यापीठ प्रशासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास, विद्यार्थीहितार्थ तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *