कल्याणमधील उंबर्डे गावात रिव्हाॅल्व्हरचे प्रदर्शन करून हळदी समारंभात नृत्य
कल्याण : स्वसंरक्षणासाठी शासन परवानगीने मिळालेले रिव्हाॅल्व्हर सार्वजनिक ठिकाणी खुलेपणाने मिरविण्यास प्रतिबंध आहे. फक्त स्वसंरक्षणासाठीच या रिव्हाॅल्व्हरचा धारकाने वापर करायचा आहे. हे शस्त्र परवानाविषयक नियम असताना कल्याणमधील उंबर्डे गावात शुक्रवारी रात्री एक व्यक्ति जवळील रिव्हाॅल्व्हर काढून व्यासपीठावर गर्दीत हातात फिरवत, रिव्हाॅल्व्हरचे प्रदर्शन करत हळदी समारंभात नाचत असल्याची दृश्यध्वनीचित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याने खळबळ उडाली आहे. यापूर्वी