पंतप्रधान मोदी १५ जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर! ‘या’ तीन युद्धनौकांचे करणार लोकार्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या १५ जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यामध्ये पंतप्रधान वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. ज्यामध्ये नौदलाच्या तीन युद्धनौकांचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते केले जाईल. तसेच नवी मुंबईतील एका इस्कॉन मंदिराचे उद्घाटन देखील पंतप्रधान मोदी करणार आहेत. १५ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सकाळी सुमारे १० वाजून ३० मिनिटांनी मुंबईच्या नौदल गोदीत