1. संजय गांधी निराधार योजना समिती सदस्यपदी करंबवणे गावचे माजी सरपंच संजय जाधव यांची निवड
  2. धनंजयभाई देसाई यांच्या पुण्यातील घरावर दरोडा टाकून,अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमांवर कारवाई करावी – हिंदूराष्ट्र सेना कार्यकर्त्यांची जिल्हा अधिकारी यांच्याकडे आग्रही मागणी
  3. भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मुंबई वृत्तपत्र विक्रेता दीन साजरा करण्यात आला
  4. बॉर्डरलेस बाबासाहेब एक विचार चे प्रणेते डॉक्टर राजेंद्र जाधव यांना सर्वपक्षीय मेळाव्यामध्ये अस्वस्थ वाटल्यामुळे सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये केलं भरती. भदंत डॉक्टर राहुल बोधी महाथेरो यांनी घेतली हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट
  5. आपुलकी मतिमंद शाळा कर्म शाळेमध्ये वैद्यकीय तपासणी व पालक मेळावा संपन्न
ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 | महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 | Mahayuti vs MVA

मुंबई : राज्यात 236 ठिकाणी आघाडी घेऊन महायुतीने ऐतिहासिक असं यश मिळवलं आहे. त्यामध्येही भाजपने सर्वाधिक म्हणजे 137 जागांवर आघाडी घेत जोरदार मुसंडी मारल्याचं दिसतंय. महायुतीचे अनेक उमेदवार हे लाखांमध्ये लीड घेऊन निवडून आले आहेत. सर्वाधिक मतं घेणाऱ्या दहा आमदारांमध्ये सर्वच आमदार हे महायुतीचे आहेत. साताऱ्यामधून शिवेंद्रराजे भोसले यांनी तब्बल 1 लाख 42 हजारांचे मताधिक्य घेऊन राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. तर त्या खालोखाल अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांनी 1.41 लाखांचं मताधिक्य घेतलं

सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील 10 आमदार 

1. सातारा मतदारसंघ- शिवेंद्रराजे भोसले (भाजप) – 01 लाख 42 हजार 124 मताधिक्याने विजयी.

2. परळी- धनंजय मुंडे (राष्ट्रवादी) – 01 लाख 41 हजार 241 मतांनी विजयी

3. बागलाण- दिलीप बोरसे (भाजप) – 129297 मतांनी विजयी 

4. कोपरी पाचपाखाडी – एकनाथ शिंदे (शिवसेना) – 01 लाख 20 हजार 335 मतांनी विजयी

5. कोथरुड – चंद्रकांत पाटील (भाजप)- 1 लाख 12 हजार 41 मतांनी विजयी 

6. ओवळा माजीवड – प्रताप सरनाईक (शिवसेना) – 1 लाख 9 हजार पेक्षा जास्त मतांनी विजयी..

7. मावळ मतदारसंघ – सुनील शेळके (राष्ट्रवादी) – 01 लाख 08 हजार 565 मतांची विजयी

8. चिंचवड मतदारसंघ – भाजपा उमेदवार शंकर जगताप – ०१ लाख ०३ हजार ८६५ मतांनी विजयी.

9. बारामती मतदारसंघ – राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार अजित पवार – 1 लाख 899 मतानी विजयी

10. दादा भुसे, मालेगाव बाह्य (शिंदे गट)= 1,02,440 मताधिक्य 

या व्यतिरिक्त मुब्रा कळवा मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र आव्हाड हे 96 हजार 228 मतांनी विजयी झालेत. तर बोरिवली मतदारसंघातील भाजप उमेदवार संजय उपाध्याय हे 95 हजार 54 मतांनी जिंकले आहेत. 

राज्यातल्या जनतेचा महायुतीला स्पष्ट कौल

महाराष्ट्राच्या मतदारांनी पुन्हा एकदा महायुतीवर विश्वास ठेवत त्यांना सत्ता बहाल केली आहे. मात्र एवढ्यापुरतं हे मर्यादीत नाही. अनेक शक्यता, चर्चा यांना पूर्णविराम देत सर्वसामान्य मतदाराने आपला स्पष्ट कौल नेमका कोणाला हे दाखवून दिलंय. काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत याच मतदारांनी महाविकास आघाडीच्या पारड्यात भरभरून मतदान करत महायुतीला योग्य तो इशारा दिला खरा. मात्र विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीला स्पष्ट कौल दिला.  

महायुतीच्या विजयातही देदीप्यमान कामगिरी केलीय ती भाजपने. भाजपची राज्यातली आजवरची ही सर्वोत्तम कामगिरी. दुसरीकडे महाविकास आघाडीचा पराभव हा दारूण म्हणता येईल असाच आहे. काँग्रेसने 20 चा आकडा पार केला असला तरी ठाकरे गट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मतदारांनी सपशेल नाकारल्याचं दिसतंय. राज ठाकरे, वंचित बहुजन आघाडीलाही जनतेनं सपशेल नाकारलं. 

Leave feedback about this

  • Quality
  • Price
  • Service

PROS

+
Add Field

CONS

+
Add Field
Choose Image
Choose Video