अमरावतीचे ‘ इंडिसेंट प्रपोजल ‘ प्रकरण तापले
अमरावती : स्वातंत्र्य दिनी जालन्यात उपोषणकर्त्यांना पालकमंत्र्यांना भेटू न देता पोलीस उप अधीक्षकाने उडी घेत त्यांच्या कमरेत लाथ घातल्याचे छायाचित्र राज्यात एकीकडे गाजत आहे. तर दुसरीकडे अमरावती येथे जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार यांच्या पत्नीने एका पत्रकार महिलेला थेट उपोषण स्थळी जावून धमकी दिल्याची घटना स्वातंत्र्य दिनीच घडली आहे. त्यामुळे गेले काही दिवस राज्यात गाजत