पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा आज निकाल
ठाणे : सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या बहुचर्चित हत्येप्रकरणाचा निकाल आज, शनिवारी पनवेल सत्र न्यायालयात लागणार आहे. या प्रकरणात ठाणे ग्रामीण पोलीस दलातील बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्यासह इतर आरोपी आहेत. या प्रकरणाचा काय निकाल लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून नऊ वर्षांपूर्वी घडलेले हे प्रकरण काय होते, हे जाणून घेऊया. पोलीस दलात सहायक पोलीस निरीक्षक पदावर