वृत्तपत्र विक्रेत्यांवर कारवाई होणार नाही; बदलापूर मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन, प्रेस क्लब ऑफ बदलापुरच्या मागणीला यश
बदलापूरः शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण कारवाईत अनावधानाने वृत्तपत्र विक्रेत्यांवर कारवाई झाली. मात्र यापुढे त्यांच्यावर कारवाई केली जाणार नाही. तसेच त्यांचे जप्त साहित्यही त्यांना परत केले जाईल, असे आश्वासन कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांनी दिले आहे. प्रेस क्लब ऑफ बदलापुरच्या सदस्यांनी गुरूवारी पालिका मुख्यालयात मुख्याधिकारी गायकवाड यांची भेट घेतली. वृत्तपत्र विक्रेत्यांना संरक्षण देण्यासाठीचा आदेश