डोंबिवलीतील बेकायदा इमारतीचा नियमानुकूलचा प्रस्ताव नगररचना विभागाने फेटाळला; याचिकाकर्त्याची प्रशासनाविरुध्द अवमान याचिकेची तयारी
कल्याण – डोंबिवलीतील ६५ महारेरा प्रकरणातील रहिवासी, बांधकामधारकांनी आपली इमारत नियमानुकूल करावी, यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागाकडे प्रस्ताव दाखल केले आहेत. या दाखल सतरा प्रस्तावांंपैकी डोंबिवली पश्चिमेतील घनश्याम गुप्ते रस्त्यावरील जयहिंद काॅलनीत उभारण्यात आलेल्या एका बेकायदा इमारतीचा प्रस्ताव नगररचना विभागाने इमारत बांधकाम परवानगीसाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांअभावी फेटाळून लावला आहे. या इमारतीमधील रहिवाशांनी आवश्यक कागदपत्रे