पडवे ग्रामस्थांची आमदार भास्करशेठ जाधव यांच्याकडे विकास कामांबाबत आग्रही मागणी
आबलोली (संदेश कदम)गुहागर तालुक्यातील पडवे येथील ग्रामस्थ आणि शिवसेना (उबाठा) पदाधिकारी यांनी आज आमदार भास्कर जाधव यांची चिपळूण कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. गावातील विविध विकासकामांबाबत समस्या मांडताना, गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेली पडवे एस.टी स्टँडवरील बस सेवा त्वरित पूर्ववत सुरू करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच गेल्या काही महिन्यांपासून पडवे एस.टी स्टँडवरील बससेवा बंद असून,