घरं २६ हजार, अर्ज २२ हजार; कुणाला कुठे घर मिळणार? ‘या’ तारखेला अंतिम यादी येणार!
नवी मुंबई: मोठा गाजावाजा करत सिडकोकडून महिन्याभरापूर्वी नवी मुंबईतल्या तब्बल २६ हजार ५०२ घरांची घोषणा करण्यात आली. पण गरीब व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी ही ‘परवडणारी’ घरं ‘महागच’ ठरल्याचं चित्र निर्माण झालं आहे. अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देऊनही या घरांसाठी अवघे २२ हजार अर्ज दाखल झाल्याचं स्पष्ट झालं आहे. आता तिसऱ्यांदा मुदतवाढ न देता पुढील कार्यक्रमच