मुंबईसह राज्यभरात दहीहंडीचा उत्साह, मुंबईत लाखोंच्या दहीहंड्या, यंदा किती थर लागणार?
प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित संस्कृतीची दहीहंडी विश्वविक्रमी दहीहंडी उत्सवात 2025 मधील पहिले 10 थर रचत कोकण नगरचा राजा गोविंदा पथकाने विश्वविक्रमाची नोंद केली. त्यांना 25 लाख रुपयाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले. हा क्षण सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा आहे. 9 थरांपासून 10 थरांपर्यंतचा प्रवास यापूर्वीही संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या मंचावर 9 थरांचा विश्वविक्रम घडला