डोंबिवलीत सुभाष रस्ता भागात दूषित पाणीपुरवठा, गटारांची खोदाई करताना जलवाहिन्या तुटल्या
डोंबिवली – येथील पश्चिमेतील सुभाष रस्त्यावरील क्रांती व्यापारी संकुल, नवापाडा, सुभाष रस्ता ते चिंचोड्याचापाडा, कुंभारखाणपाडा भागात काही दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा नागरिकांना होत आहे. या दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने याविषयी पालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. डोंबिवली पश्चिमेतील सुभाष रस्ता, नवापाडा ते कुंभारखाण पाडा, चिंचोड्याचा पाडा भागाला दूषित पाण्याचा