‘न्यू इंडिया’ तील अपहाराची रक्कम ‘झोपु’ योजनेत
मुंबई : न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील १२२ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणातील ७० कोटी रुपये चारकोप येथील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात गुंतवण्यात आले तर उर्वरीत ४० कोटी रुपये सोलर पॅनल व्यावसायिकाला देण्यात आली असून महाव्यवस्थापक हितेश मेहताने स्वत:ही काही रक्कम वापरल्याचे चौकशीत सांगितले. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. गेल्या पाच वर्षांपासून आरोपीने प्रभादेवी व गोरेगाव