होळीदरम्यान लाकडांचे दहन करण्यास मनाई ! रासायनिक रंगाचा वापर, पादचाऱ्यांवर पाण्याचे फुगे फेकणाऱ्यांवर होणार कारवाई
ठाणे : जिल्ह्यात १३ मार्च रोजी साजरा होणाऱ्या होळी आणि १४ मार्च रोजी साजरा केल्या जाणाऱ्या धुलीवंदनाच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी मनाई आदेश जाहीर केले आहेत. यामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून सार्वजनिक ठिकाणावरील झाडे, लाकडे तोडणे तसेच दहन करण्यास मनाई लागू करण्यात आली आहे. तर