घोडबंदरमधील आदिवासी जमीनीवरील ३४० बांधकामे होणार जमीनदोस्त
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा भागातील ५४ बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नुकतेच दिले असतानाच, त्यापाठोपाठ घोडबंदर येथील ओवळा भागातील पानखंडा, बमनानी पाडा या भागात आदीवासी जमिनींवर उभारण्यात आलेल्या बेकायदा बांधकामांवर उच्च न्यायलयाने कारवाईचे आदेश दिले आहेत. याठिकाणी सुमारे ३४० बेकायदा बांधकामे असून त्यात बैठ्या चाळी आणि २५ ते ३० बंगले आहेत. या बांधकामांना