कल्याणमध्ये मद्यधुंद कार चालकाची दहा दुचाकींना धडक, कार चालक अनिल तिवारी पोलिसांच्या ताब्यात
कल्याण : कल्याण पश्चिमेतील बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीतील चिराग हाॅटेल समोरील रस्त्यावर शुक्रवारी रात्री एका मद्यधुंद मोटार कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. या वाहन चालकाने रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या आठ ते दहा दुचाकींना जोरदार धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणी जखमी झाले नाही. मोटारीसह दुचाकींचे वाहनाच्या धडकेत नुकसान झाले आहे. चिराग हाॅटेल समोरील रस्त्यावरून एका मोटार कार