डोंबिवलीत बेकायदा फलक लावणाऱ्या आस्थापनांवर फौजदारी गुन्हे, पाच हजार फलकांवर कारवाई
डोंबिवली : कल्याण डोंबिवली पालिकेच्या मालमत्ता विभागाच्या परवानग्या न घेता डोंबिवली रेल्वे स्थानक भागात विविध प्रकारचे जाहिरात फलक लावून शहराचे आणि मालमत्तेचे विद्रुपीकरण करणाऱ्या आस्थापना, जाहिरातधारकांविरुध्द पालिकेच्या ग प्रभाग कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी मालमत्ता विरुपणास प्रतिबंध कायद्याने फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. अर्धवेळ नोकऱ्या तात्काळ उपलब्ध, दुकानात कामे करण्यासाठी तात्काळ कामगार पाहिजेत, विविध प्रकारचे खासगी शिकवणी