कल्याणमध्ये ट्रकने आई, मुलाला चिरडले; मनसेसह नागरिकांचे रस्ता रोको
कल्याण येथील पश्चिमेतील लालचौकी भागात बुधवारी सकाळी भरधाव वेगात असलेल्या एका ट्रक चालकाने रस्ता ओलांडत असलेल्या महिला आणि तिच्या मुलाला चिरडले. या दोघांना तात्काळ पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आले. तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेबद्दल शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पालिका, रस्ते नियंत्रक एमएमआरडीए आणि वाहतूक पोलिसांच्या निष्क्रियतेचा हा बळी आहे, असा आरोप