पंतप्रधान मोदींबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या श्रीपाल सबनीस यांची आता ब्राह्मण समाजावर टीका; म्हणाले, “नथुराम गोडसे…”
अकोला : नथुराम गोडसे नीच आणि नालायक ब्राह्मण होता. त्यांने महात्मा गांधींमधील महात्म्याला ठार मारले. आजचे हिंदुत्ववादी त्याच नथुराम गोडसेचे पुतळे व मंदिरे उभारत आहेत. हे धर्माचे नसून धर्माच्या घातकपणाचे कार्य आहे, असे वक्तव्य अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. यावेळी त्यांनी ब्राह्मण समाजावर टीका करून पूर्वजांच्या