वृद्ध महिलेला फसवून तिच्या सोन्याच्या दागिन्यांची लूट…
डोंबिवली : डोंबिवली पूर्वेच्या टिळकनगर भागात १५ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी एका वृद्ध महिलेला फसवून तिच्या सोन्याच्या दागिन्यांची लूट केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी टिळकनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अवघ्या २४ तासांत पोलिसांनी आरोपी महिलेला पकडून लंपास केलेले सर्व दागिने हस्तगत केले आहेत. फिर्यादी हंसा जयंतीलाल पांचाळ (६२),या गृहिणी, हिरण पार्क,डोंबिवली येथे