शिळफाटा मार्गावर कोंडित अडकायची आम्हाला सवय, आता तर पाच दिवस सुट्टी घेऊ… प्रवाशांच्या उद्विग्न प्रतिक्रिया
डोंंबिवली : कल्याण-शिळफाटा रस्त्यावरून दररोज जात असताना वाहतूक कोंडीमुळे आम्ही हैराण असतो. आमच्या नशिबीच ही कोंडी का आली, असे प्रश्न आम्ही दररोज कार्यालयात जात असताना करत असतो. आता तर निळजे रेल्वे उड्डाण पुलाच्या पुनर्बांधणीचे काम ५ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत करण्यात येणार आहे. या कालावधीत शिळफाटा रस्त्यावरील पलावा जंक्शनकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार