शाहीर शाहिद खेरटकर यांना कलगी- तुरा समाज उन्नती मंडळ,चिपळूणचा “शाहिरी प्रेरणा पुरस्कार” प्रदान
आबलोली (संदेश कदम)कलगी- तुरा समाज उन्नती मंडळ चिपळूणच्या वतीने देण्यात येणारा “शाहिरी प्रेरणा पुरस्कार २०२५” शाहीर शाहिद खेरटकर यांना इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.मानपत्र,सन्मानचिन्ह, शाल,श्रीफळ आणि रोख रक्कम १००० रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते.कोकणची समृद्ध लोककला जाखडी, कलगी- तुरा गेली पंचवीस वर्षे शाहीर शाहिद खेरटकर जोपासत आहेत.आपल्या लेखणीतून,गायनातून