कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश मोरे गटारात पडून जखमी, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या दौऱ्यादरम्यान अपघात
अंबरनाथ: कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश मोरे एका अपघातात तोल गेल्याने गटारात पडले. यात ते जखमी झाले असून त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी कल्याण लोकसभा मतदारसंघात विविध विकासकामांची पाहणी करण्यासाठी खासदार डॉ श्रीकांत शिंदे अंबरनाथ शहरात होते. अंबरनाथ शहरात क्रीडा संकुल, नाट्यगृह, शाळा आणि शिवमंदिर सुशोभीकरण प्रकल्पाच्या कामाची पाहणी यावेळी