कल्याण पूर्वेतील विकासकामांना गती देण्यात यावी, आ. सुलभा गायकवाड यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
डोंबिवली : कल्याण पूर्वेतील रखडलेल्या विकास कामांना गती देऊन ती कामे लवकरात लवकर पूर्ण करावी. काही कामांचा शासन दरबारी प्रस्ताव पाठवून ती मंजूर करून घेण्यात यावी यासाठी कल्याण पूर्वेच्या नवनिर्वाचित आमदार सुलभा गायकवाड यांनी केडीएमसी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची भरत घेतली. लोकोपयोगी विविध विकास कामे, तसेच शासन दरबारी प्रलंबित असलेल्या कामांबाबत यावेळी सविस्तर चर्चा