ठाण्यातील विकासकांना काम थांबविण्याचे आदेश, हवा प्रदूषण रोखण्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पालिकेची कारवाई
ठाणे : शहरात बांधकाम सुरू असताना हवा प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने विकासकांना नियम आखून दिले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ०७ विकासकांना काम थांबविण्याचे आदेश महापालिकेच्या शहर विकास विभागाकडून देण्यात आले आहेत, अशी माहिती सहाय्यक संचालक नगररचना संग्राम कानडे यांनी दिली. प्रदूषण नियंत्रण नियमावलीची पूर्तता केल्यावर या विकासकांना काम सुरू करण्याची परवानगी दिली जाणार आहे. हवा प्रदूषण