ठाण्यात गुटख्याचा मोठा साठा पकडला
ठाणे : ठाण्यातील वागळे इस्टेट भागात एका घरामध्ये सुमारे ९० गोण्या भरून गुटखा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. तर त्याच्या दुसऱ्या साथिदाराचा पोलीस शोध घेत आहेत. घरामधूनच वागळे इस्टेट भागातील टपऱ्यांवर या गुटख्याचा साठा पुरविला जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा