कळवा रुग्णालयाचे नुतनीकरणाचे काम टप्प्याटप्प्याने होणार, कार्यादेश दिल्याने लवकरच कामाला होणार सुरूवात
ठाणे : ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णांना चांगली आरोग्य सुविधा मिळावी यासाठी रुग्णालयाच्या नुतनीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. राज्य शासनाने दिलेल्या ६० कोटींच्या निधीमधून हे काम केले जाणार असून या कामाचा कार्यादेश ठेकेदाराला देण्यात आल्याने लवकरच कामाला सुरूवात होणार आहे. एकाच वेळी नुतनीकरणाचे काम करणे शक्य नसल्यामुळे पालिका टप्प्याटप्प्याने नुतनीकरणाचे काम