शिवसेना (UBT) पदाधिकाऱ्यांचा अधिकाऱ्यांवर आक्रमक पवित्रा, समस्यांचे निराकरण न झाल्यास आंदोलन
कोपरखैरणे : कोपरखैरणे प्रभागातील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी आक्रमक झाले असून, त्यांनी कोपरखैरणे विभाग कार्यालयात अधिकाऱ्यांशी तीव्र शब्दांत संवाद साधला. संपर्कप्रमुख एम. के. मढवी, जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, प्रवीण म्हात्रे आणि महिला जिल्हा संघटक रंजनाताई शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पाणीपुरवठा, पावसाळापूर्व नाले-गटारांची साफसफाई आणि रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.