आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील नागरिकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्या आणि प्रश्न आक्रमकपणे मांडण्यासाठी आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी “आपलं गुहागर” व्हाट्सअप ग्रुप हे आपलं हक्काचं व्यासपीठ असून हे व्यासपीठ गुहागर मधील सामाजिक कार्यकर्ते आणि शिवतेज फाउंडेशनचे संस्थापक, अध्यक्ष व प्रसिद्ध वकील ॲड. संकेत साळवी यांच्या संकलनेतून आणि पुढाकाराने निर्माण करण्यात आलेले आहे. “आपलं गुहागर” या व्हाट्सअप ग्रुप हा समाजाच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यासपीठावर एकत्र आलेल्या सर्व जागरूक नागरिकांना आणि सहभागी नसलेल्या पण गुहागर मधील सामाजिक प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी तळमळ असलेल्या सर्व गुहागरप्रेमी नागरिकांना आणि जनतेला जाहीर आवाहन करण्यात येत आहे की, गुहागर तालुक्यात असलेल्या अनेक समस्या पैकी प्रामुख्याने रस्त्यांवरचे खड्डे आणि मोकाट गुरे या भेडसावणाऱ्या प्रश्नांवर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी आणि प्रत्यक्ष कृती करण्यासाठी सोमवार दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी 5:00 गुहागर येथील ज्ञान रश्मी वाचनालय येथे महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी या बैठकीला गुहागर मधील नागरिकांनी आणि “आपलं गुहागर” व्हाट्सअप या ग्रुपच्या सर्व सभासदांनी या बैठकीला बहुसंख्येने उपस्थित राहावे असे जाहीर आवाहन गुहागर येथील सामाजिक कार्यकर्ते आणि शिवतेज फाउंडेशनचे संस्थापक, अध्यक्ष व प्रसिद्ध वकील ॲड. संकेत साळवी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988
Leave feedback about this