आबलोली (संदेश कदम)
राजापूर तालुक्यातील पडवे येथील नवोदय विद्यालया मध्ये जे एस डब्ल्यू कंपनीच्या सीएसआर फंडातून येथील विद्यार्थ्यांची गैरसोय ओळखून पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत आणि रत्नागिरीचे प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्या पाठपुराव्यानंतर तीनशे पंखे आणि दहा इलेक्ट्रिक गिझर यावेळी आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सुपूर्द करण्यात आले. हा कार्यक्रम आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.
राजापूर मधील नवोदय विद्यालयातील विद्यार्थी चांगल्या दर्जाचे शिक्षण घेऊन तालुक्याचे आणि जिल्ह्याचे नाव उज्वल करीत आहेत. येथील विद्यार्थ्यांना गरम पाण्याचे गैरसोय होत असल्याने विद्यार्थी आजारी पडत होते.ही गरज ओळखून आमदार किरण सामंत यांनी जेएसडब्ल्यू कंपनीच्या माध्यमातून पंखे आणि गिझर देण्याचा शब्द दिला होता. पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा झाल्यानंतर रत्नागिरीचे प्रांत अधिकारी जीवन देसाई यांनी या विषयाचा पाठपुरावा करून तीनशे फॅन आणि दहा इलेक्ट्रिक गिझर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांकडे सुपूर्द केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार सामंत यांनी नवोदय विद्यालय ची कौतुक केले ते म्हणाले की, येथील विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षकांचे मेहनत पाहता त्यांचे कौतुक करावे तितके थोडे आहे. ह्या विद्यालयातून आयपीएस आयएएस अधिकारी घडावेत आणि लांजा, राजापूर, रत्नागिरी जिल्ह्याचे नाव उज्वल करावे हे प्रामाणिक इच्छा असल्याचा स्पष्ट मत आमदार किरण सामंत यांनी व्यक्त केले.
यावेळी माजी शिक्षण सभापती विलास चाळके, जिल्हा नियोजन समिती सदस्य दीपक नागले, रवी नागरेकर, आरटीसी बँकेचे संचालक म्हणून खामकर, जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या संपदा धोपटकर, प्राचार्य एम. बसवराज, नायब तहसीलदार सरफरे, निलेश सुर्वे, निनाद अवसरे, बाबू अवसरे, जानवी गावकर, मनोज आडविलकर, राजन कोंडेकर, नंदू मिरगुले, दिनेश पवार यांच्यासह विद्यार्थी, पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988
Leave feedback about this