1. संजय गांधी निराधार योजना समिती सदस्यपदी करंबवणे गावचे माजी सरपंच संजय जाधव यांची निवड
  2. धनंजयभाई देसाई यांच्या पुण्यातील घरावर दरोडा टाकून,अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमांवर कारवाई करावी – हिंदूराष्ट्र सेना कार्यकर्त्यांची जिल्हा अधिकारी यांच्याकडे आग्रही मागणी
  3. भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मुंबई वृत्तपत्र विक्रेता दीन साजरा करण्यात आला
  4. बॉर्डरलेस बाबासाहेब एक विचार चे प्रणेते डॉक्टर राजेंद्र जाधव यांना सर्वपक्षीय मेळाव्यामध्ये अस्वस्थ वाटल्यामुळे सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये केलं भरती. भदंत डॉक्टर राहुल बोधी महाथेरो यांनी घेतली हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट
  5. आपुलकी मतिमंद शाळा कर्म शाळेमध्ये वैद्यकीय तपासणी व पालक मेळावा संपन्न
ई पेपर महाराष्ट्र राजकीय

कल्याण डोंबिवलीतील मतदारांनी रचला मतदान वाढीचा अध्याय, कल्याणमधील कमी मतदानाबद्दल निवडणूक आयोगाने व्यक्त केली होती खंत

कल्याण : राज्यातील सर्वाधिक कमी मतदान हे कल्याण मतदार संघात होत असल्याची खंत केंद्रीय मुख्य निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी घेतलेल्या एका निवडणूक विषयक आढावा बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली होती. त्यामुळे कल्याण, डोंबिवली परिसरातील मतदान वाढविण्यासाठीचे मोठे आव्हान स्थानिक प्रशासन, निवडणूक यंत्रणेवर होते. हे आव्हान पेलून स्थानिक पालिका, शासन प्रशासन यंत्रणांनी केलेल्या प्रयत्नांमुळे यावेळी प्रथमच मतदानाचा टक्का ११ ते १५ टक्के वाढला.

मागच्या २०१८, २०१९ या दोन सत्रांमध्ये विधानसभा निवडणुकीतील मतदान हे ४४ ते ४७ टक्क्यांपर्यंत स्थिरावले होते. यावेळी प्रथमच कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन, या प्रशासनाचा शिक्षण विभाग, दहा प्रभागातील साहाय्यक आयुक्त, स्थानिक शासकीय यंत्रणा यांनी गेल्या दीड ते दोन महिन्यात कल्याण, डोंबिवली शहर परिसरातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी दैनंदिन विविध उपक्रम ठाणे जिल्हा मतदान वाढ प्रोत्साहन (स्वीप) समन्वयक अधिकारी, पालिका उपायुक्त संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविले.गृहनिर्माण सोसायट्या, या संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक, स्वयंसेवी संस्था यांना मतदान जागृती प्रक्रियेत सामावून आपल्या संस्थेतील प्रत्येक सदस्यासह परिसरातील नागरिकांनी मतदान करावे यासाठी या संस्थांनी उपक्रम हाती घेतले. कल्याण डोंबिवली पालिकेच्या शिक्षण विभागातील अधिकारी विजय सरकटे यांनी शाळा, विद्यार्थी, पालकांच्या माध्यमातून मतदान जनजागृतीचे उपक्रम राबविले. या मतदान जनजागृतीचा परिणाम इतका झाला की यावेळी प्रथमच गेल्या दहा वर्षानंतर प्रथमच कल्याण, डोंबिवलीतील चारही मतदारसंघातील टक्केवारी यावेळी ११ ते १५ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. नागरिक सकाळी सात वाजल्यापासून मतदानासाठी स्वताहून बाहेर पडले होते. लोकसभा निवडणूक काळात कल्याण, भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सुमारे एक लाखाहून अधिक मतदारांना यादीत नाव नसल्याने मतदानाला मुकावे लागले होते. लोकसभा निवडणुका संपल्यानंतर भाजप, शिवसेना, मनसे आणि इतर पक्षीयांनी खास मतदार नोंदणीसाठी आपल्या स्तरावर उपक्रम राबविले.

भाजपने डोंबिवलीत जून ते सप्टेंबर कालावधीत घरोघरी जाऊन मतदान नोंदणीची प्रक्रिया राबवली. निवडणूक विभाग, महसूल अधिकाऱ्यांच्या सहकार्याने जिल्हा माहिती कार्यालयाचे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप आणि सहकाऱ्यांनी समाज माध्यमातून मतदार जनजागृतीचे अनेक उपक्रम राबविले. मतदानाच्या दोन दिवस अगोदर मतदान यादीतील नाव, केंद्र, केंद्रापर्यंत मतदारांनी कसे जावे याविषयी साधेसोपे मार्ग संंकेतस्थळ, क्युआर कोडच्या माध्यमातून समाज माध्यमातून उपलब्ध दिले. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे कल्याण, डोंबिवली शहर परिसरातील ही मतदान टक्केवाढ आहे, अशी माहिती समन्वय अधिकारी संजय जाधव यांनी दिली.गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये निवडणूक विभागाच्या आदेशाप्रमाणे मतदान जनजागृतीचे उपक्रम अतिशय प्रभावीपणे राबविले. मतदान करणे कसे राष्ट्रीय कर्तव्य आहे हे नागरिकांच्या मनावर बिंबवले. मतदारांच्या घरापर्यंत त्यांना मतदार यादीतील नाव ते मतदान केंद्राची माहिती दिली. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणजे मतदान वाढ आहे.

Leave feedback about this

  • Quality
  • Price
  • Service

PROS

+
Add Field

CONS

+
Add Field
Choose Image
Choose Video