1. संजय गांधी निराधार योजना समिती सदस्यपदी करंबवणे गावचे माजी सरपंच संजय जाधव यांची निवड
  2. धनंजयभाई देसाई यांच्या पुण्यातील घरावर दरोडा टाकून,अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमांवर कारवाई करावी – हिंदूराष्ट्र सेना कार्यकर्त्यांची जिल्हा अधिकारी यांच्याकडे आग्रही मागणी
  3. भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मुंबई वृत्तपत्र विक्रेता दीन साजरा करण्यात आला
  4. बॉर्डरलेस बाबासाहेब एक विचार चे प्रणेते डॉक्टर राजेंद्र जाधव यांना सर्वपक्षीय मेळाव्यामध्ये अस्वस्थ वाटल्यामुळे सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये केलं भरती. भदंत डॉक्टर राहुल बोधी महाथेरो यांनी घेतली हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट
  5. आपुलकी मतिमंद शाळा कर्म शाळेमध्ये वैद्यकीय तपासणी व पालक मेळावा संपन्न
Blog आणखी ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

डोंबिवली एमआयडीसीतील मालवाहू वाहने अडकली, पाण्याचे टँकर वेळेत पोहचत नसल्याने उत्पादनावर परिणाम

कल्याण : शिळफाटा रस्त्यावर जड, अवजड वाहनांना पाच दिवस बंदी घालण्यात आली आहे. राज्याच्या विविध भागातून डोंबिवली एमआयडीसीत कच्चा माल घेऊन येणारी वाहने बंदीमुळे दिलेल्या वेळेत कंपनीत येणार नसल्याने उत्पादन कसे करायचे आणि कंपनीत तयार झालेला पक्का माल बाहेर कसा पाठवयाचा, या विवंचनेत डोंबिवली एमआयडीसीतील उद्योजक आहेत.

तसेच, डोंबिवली एमआयडीसीला कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. बहुतांशी उद्योजक खासगी पाणी पुरवठादारांकडून टँकरव्दारे पाणी विकत घेतात. या पाण्याचे टँकर शिळफाटा रस्त्याने धावतात. या रस्त्यावर वाहतूक कोंडी सुरू झाल्याने पाण्याचे टँकर ठरलेल्या वेळेत कंपनीत येत नाहीत. उत्पादनासाठी लागणारे पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने उत्पादित मालावर परिणाम झाला आहे, असे कंपनी चालकांनी सांगितले.

निळजे रेल्वे उड्डाण पुलावर रेल्वेकडून पुलाची पुनर्बांधणी होणार आहे. हा पूलही महत्वाचा आहे. त्यामुळे पाच दिवसांचा त्रास आम्ही आता सहन करू. हे काम कधीतरी करावेच लागणार होते. पावसाळ्याऐवजी ते आता होत आहे. हे पण महत्वाचे आहे, असे उद्योजकांनी सांगितले.

डोंबिवली एमआयडीसीतील काही कंपन्यांमध्ये उत्तर, दक्षिण भारतामधील उद्योजकांकडून कच्चा माल रस्ते मार्गाने आणला जातो. शिळफाटा रस्त्यावर सहा चाकी, १२, २४ चाकी जड, अवजड मालवाहू वाहनांना प्रवेश बंद आहे. त्यामुळे नवी मुंबई, पनवेल, रायगड परिसरातून डोंबिवली एमआयडीसीकडे येणाऱ्या वाहन चालकांसमोर मोठा प्रश्न पडला आहे. ही वाहने शिळफाटा रस्ता बंद असल्याने नवी मुंबई परिसरात खोळंबली आहेत. या वाहनांना आता मुंब्रा खारेगाव, भिवंडी बाह्यवळण रस्ता, दुर्गाडी पूल भागातून वळसा घेऊन डोंबिवलीत यावे लागेल. या वाहनांंना पत्रीपूल येथे वाहतूक पोलिसांनी अवजड वाहन म्हणून अडविले तर मोठी डोकेदुखी होणार आहे, असे उद्योजकांनी सांगितले.

एमआयडीसीतील काही कंपन्यांमध्ये पक्का माल तयार आहे. शिळफाटा रस्ता बंद असल्याने वाहन चालक हा पक्का माल अवजड वाहनात भरून इच्छित स्थळी जाण्यास तयार नाहीत. ही वाहने पर्यायी मार्गाने नेण्यासाठी वळसा घेऊन जावे लागणार असल्याने वाहन चालक पक्का माल वाहून नेण्यास तयार नाहीत, असे उद्योजकांनी सांगितले. समोरील खरेदीदारांनी पक्क्या मालाची नोंदणी केली आहे. माल वाहून नेण्यासाठी वाहन चालक तयार होत नसल्याने उद्योजकांची कोंडी झाली आहे.

संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988

Leave feedback about this

  • Quality
  • Price
  • Service

PROS

+
Add Field

CONS

+
Add Field
Choose Image
Choose Video