1. संजय गांधी निराधार योजना समिती सदस्यपदी करंबवणे गावचे माजी सरपंच संजय जाधव यांची निवड
  2. धनंजयभाई देसाई यांच्या पुण्यातील घरावर दरोडा टाकून,अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमांवर कारवाई करावी – हिंदूराष्ट्र सेना कार्यकर्त्यांची जिल्हा अधिकारी यांच्याकडे आग्रही मागणी
  3. भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मुंबई वृत्तपत्र विक्रेता दीन साजरा करण्यात आला
  4. बॉर्डरलेस बाबासाहेब एक विचार चे प्रणेते डॉक्टर राजेंद्र जाधव यांना सर्वपक्षीय मेळाव्यामध्ये अस्वस्थ वाटल्यामुळे सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये केलं भरती. भदंत डॉक्टर राहुल बोधी महाथेरो यांनी घेतली हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट
  5. आपुलकी मतिमंद शाळा कर्म शाळेमध्ये वैद्यकीय तपासणी व पालक मेळावा संपन्न
Blog ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

नवी मुंबई : यादव नगरमधील भंगार गोडाऊनला आग 

नवी मुंबई : नवी मुंबईतील दिघा झोपडपट्टीत यादव नगर भागातील भंगार गोडाऊनला पहाटे अचानक आग लागली. गोडाऊनमध्ये प्लास्टिक आणि ऑइल मोठ्या प्रमाणात असल्याने आगीने काही वेळात रौद्ररूप घेतले. एमआयडीसी आणि नवी मुंबई मनपाच्या अग्निशमनदलाच्या सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आग विझवण्यात यश आले.

मंगळवारी (आज) पहाटे ४ वाजता दिघा येथील भंगार गोडाऊनला आग लागली. यात लाखोंचा माल जळून खाक झाला असून या गोडाऊन शेजारी उभी असलेली रिक्षा व टेम्पोही जळून खाक झाला आहे. सुदैवाने यात कोणी जखमी वा जीवितहानी झाली नाही. 

आगीची माहिती मिळताच आमच्या पथकाने घटनास्थळ गाठून आग विझवण्याचे काम सुरू केले. यावेळी अग्निशमनदलाच्या तीन गाड्यांनी मिळून सुमारे दोन तासांत आग आटोक्यात आणली. मात्र, या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. या गोदामात काही तेलाचे टँकर प्लास्टिक, चिंधी मोठ्या प्रमाणात असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागत होते. आग विझली तरी तासभर कुलिंग केले गेले. हे गोडाऊन ऐन झोपडपट्टीत असल्याने आग अन्यत्र पसरण्याची शक्यता होती. मात्र अग्निशमनदलाच्या सातर्कतेने आग पसरली नाही, अशी माहिती अग्निशमन अधिकारी नितीन कांबळे यांनी दिली. या घटनेने झोपडपट्टीमधील अनधिकृत भंगार दुकाने आणि गोडाऊनचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988

Leave feedback about this

  • Quality
  • Price
  • Service

PROS

+
Add Field

CONS

+
Add Field
Choose Image
Choose Video