आबलोली (संदेश कदम)
आबलोली ग्रामपंचायत मध्ये आरोग्य शिबिरासाठी आपण सर्व एकत्र आलेलो आहोत. आबलोली ग्रामपंचायतीने आज आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे.”स्वस्थ नारी सशक्त
परिवार ” असं या शिबिराचे नाव आहे. आबलोली, खोडदे, मासू येथील आमच्या अंगणवाडी सेविका या शिबिरात सहभागी झाल्या असून पोषण महा आहार साजरा करताना आमच्या अंगणवाडी सेविकांनी अनेक पदार्थांची पाककला,पाककृती बनवून आणलेल्या आहेत. त्याचे प्रदर्शन आम्ही मांडले असून यामध्ये पौष्टिक लाडू, वड्या,मोड आलेल्या भाज्या, पालेभाज्या त्याचप्रमाणे विविध पदार्थ बनवण्यात आलेले आहेत. हे पदार्थ मुलांसाठी व गरोदर स्तनंदा मातांसाठी आरोग्य दायक,अत्यंत पोषक असे आहेत. त्याचं प्रदर्शन आंम्ही आज मांडलेलं असून या पदार्थांमध्ये विविध प्रकारचे नुटर्न्स, विटामिन आहेत. हे पदार्थ बनवताना आमच्या अंगणवाडी सेविकांनी प्रचंड मेहनतीने विविध प्रकारच्या पाककृती, कलाकृती प्रदर्शनासाठी ठेवल्या असून असून पोषण आहाराचा महा पोषण आहार महोत्सव आंम्ही साजरा करतोय असे स्पष्ट मत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प गुहागर, आबलोली बिटच्या पर्यवेक्षिका रसिका माटल यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले
संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988
Leave feedback about this