भरती प्रक्रियाच्या सुरुवातीच्या अधिसूचित केलेल्या यादीतील पात्रता निकष किंवा नियम परवानगी घेतल्यानंतरच किंवा एखादी जाहिरात सध्याच्या नियमाविरोधात असल्याशिवाय मध्येच बदलता येणार नसल्याचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने नमूद केले. सध्याचे नियम व जाहिराती अंतर्गतचे नियम किंवा निकष बदलण्याची परवानगी असेल तरच घटनेच्या कमल १४ अंतर्गत त्यात बदल करता येईल. यात कोणालाही मनमानी करता येणार नाही. वैधानिक शक्ती असणाऱ्या विद्यमान नियमांचे पालन करणे भरती प्रक्रिया राबविणाऱ्या संस्थांना बंधनकारक आहे. निवड यादीत स्थान मिळाले तरी उमेदवाराला नियुक्तीचा कोणताही अधिकार मिळत नाही. राज्य सरकार किंवा त्यांच्या संस्था ठोस कारण असेल तर रिक्त पदे न भरण्यासंदर्भात निर्णय घेऊ शकतात, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले.
Blog
नोकरी विषयक
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, शासकीय भरतीवर कोर्टाचा निकाल
- by sanvidhanvarta
- November 12, 2024
- 0 Comments
- Less than a minute
- 674 Views
- 11 months ago

Share This Post:
Related Post
Blog, आणखी, ई पेपर, महाराष्ट्र, मुख्यपृष्ठ, राजकीय
संजय गांधी निराधार योजना समिती सदस्यपदी करंबवणे गावचे माजी
October 16, 2025
Blog, आणखी, ई पेपर, महाराष्ट्र, मुख्यपृष्ठ, राजकीय
भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ. ए. पी.जे. अब्दुल
October 16, 2025
Blog, आणखी, ई पेपर, महाराष्ट्र, मुख्यपृष्ठ, राजकीय
बॉर्डरलेस बाबासाहेब एक विचार चे प्रणेते डॉक्टर राजेंद्र जाधव
October 16, 2025
Blog, आणखी, आरोग्य व शिक्षण, ई पेपर, महाराष्ट्र, मुख्यपृष्ठ, राजकीय
आपुलकी मतिमंद शाळा कर्म शाळेमध्ये वैद्यकीय तपासणी व पालक
October 14, 2025
Blog, आणखी, ई पेपर, नोकरी विषयक, महाराष्ट्र, मुख्यपृष्ठ
मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन रत्नागिरी यांची वार्षिक सभा संपन्न
October 14, 2025
Leave feedback about this