Blog देश विदेश मनोरंजन

यंत्रणांच्या गैरवापराविरोधात एकत्र या; शरद पवार यांची भूमिका

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विरोधकांच्या विरोधात चालविलेल्या मोहिमेच्या विरोधात भाजपेतर राज्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पत्र मिळाले असून, यासंदर्भात लवकरच मुंबई किंवा दिल्लीत बैठक होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. 

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज दिल्लीत पार पडली. बैठकीनंतर पवार म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विरोधकांना नामोहरम करण्याचा डाव मोदी सरकार खेळत आहे. या लोकशाहीविरोधी कृत्याच्या विरोधात सर्व विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे. विरोधकांची बैठक कुठे होईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही; परंतु दिल्ली किंवा मुंबईत ही बैठक होईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्ष करावे, असा ठराव युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत संमत करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांनी हा ठराव मांडला. या ठरावाला एकमताने संमत करण्यात आला.

भाजपला सत्तेची नशा
सर्व राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांना संबोधित करताना पवार म्हणाले, भाजपच्या नेत्यांना सत्तेची नशा चढली आहे. लोकशाहीत विरोधक असतात; परंतु हे नेते विरोधकांना शत्रू समजतात. या विचारधारेचा विरोध करण्याची आवश्यकता आहे.

ममता बॅनर्जीचे पत्राद्वारे आवाहन 
काेलकाता : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विराेधी पक्षांना भाजपविराेधात एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सर्व गैरभाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.     सविस्तर/देश-विदेश
 

Leave feedback about this

  • Quality
  • Price
  • Service

PROS

+
Add Field

CONS

+
Add Field
Choose Image
Choose Video