आबलोली (संदेश कदम)
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तालुका गुहागर या राजकीय पक्षाची बैठक सोमवार दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11:00 वाजता गुहागर येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली असून या बैठकीत अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात येणार असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाचा शुक्रवार दिनांक 03 ऑक्टोबर 2025 रोजी क्रांती भूमी महाड येथे वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे.
या भव्य दिव्य कार्यक्रमाला जाण्यासाठी महिला – पुरुष – कार्यकर्त्यांचे आणि सभासदांचे तसेच गाड्यांचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिका, नगरपरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारी बाबत आढावा घेऊन ठाम निर्धार करण्यात येणार आहे. तसेच पक्ष संघटना वाढीसाठी सभासद मोहीम आक्रमकपणे राबवण्याचा निर्धार करण्यात येणार आहे अशा अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात येणार असून यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) या पक्षाच्या तालुका गुहागरची संपूर्ण कार्यकारणी, तालुका माजी कार्यकारणी सदस्य, तालुका युवा कार्यकारणी, युवा सदस्य, यांचेसह पदाधिकाऱ्यांनी या बैठकीला वेळेत बहुसंख्येने उपस्थित रहावे असे जाहीर आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाचे गुहागर तालुकाध्यक्ष संदीप कदम, सरचिटणीस सुनील गमरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988
Leave feedback about this